ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे २९ ऑगस्ट २०२६ रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय गाडगे होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीतील अतुलनीय योगदानाची माहिती दिली. प्रमुख अतिथी पर्यवेक्षक तिरुपती बामणे यांनी त्यांच्या जीवनप्रवास व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी गजानन बोबडे व भालचंद्र कोगंरे यांची उपस्थिती होती.

गिरीश वावळ सरांनी प्रस्तावना, तर सांस्कृतिक प्रमुख जीवन आडे सरांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये