Breaking News

आरटीओ कार्यालयात पहिल्या माळ्यावर आग कागदपत्रे जळून झाली खाक

जिल्हाधिकारी यांनी दि्ली घटनास्थळी भेट.

चांदा ब्लास्ट :

अविनाश नागदेवे प्रतिनिधी वर्धा……

प्रशासकीय इमारतीतील आरटीओ कार्यालयात पहिल्या माळ्यावर शाॅट सर्किटमुळे आग लागली असून यामुळे नागरिकांनीच चांगलीच खळबळ उडाली ही घटना वर्धा शहरात चौथी घटना घडलेली असून आज यादिवशी कामदिवस बंद असल्याने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होवून वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी लगेच घटनास्थळी दाखल झाले असून यावेळी नगर परिषद वर्धा येथील मुख्याधिकारी श्री राजेश भगत यांनी ताबोडतोब संपर्क साधला आणि अग्निशमन दलाच्या जवानांना सोबत अग्निशमन दलाच्या चार गाड्या पाठवून आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुध्दा केला आग आटोक्यात आणण्यात आली यानंतर आरटीओ कार्यालयातील अधिकारी समीर आयुब शेख व विशाल मोरे श्रीमती तृप्ती बोबडे निलेश पाटील व कर्मचारी यांनी कार्यालयात जाऊन बघितले असता कागदपत्रे जळून खाक झालेले दिसून आले आणि बाहेरच्या कामगारांना बोलावून जळालेल्या कागदपत्रांना बाहेर काढून आगीला आटोक्यात आणण्यात आले………

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये