ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरोघरी लावलेल्या बारकोड स्कॅनिंग मोहिमेस प्रारंभ

चांदा ब्लास्ट

 महानगरपालिकाच्या स्वच्छता विभागामार्फत घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी घरांवर लावण्यात आलेल्या बारकोडचे स्कॅनिंग करण्याच्या विशेष मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.

या मोहिमेअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन बारकोड स्कॅनिंग करण्यात येत असून कचरा संकलनाची नोंद डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. यामुळे कचरा संकलनाची नियमितता, सेवा पुरवठ्याची पारदर्शकता तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

तसेच ज्या घरांवर बारकोड उपलब्ध नाहीत किंवा स्कॅनिंगमध्ये अडचणी येत आहेत, त्या ठिकाणी बारकोड बसविणे व माहिती अद्ययावत करण्याचे कामही या मोहिमेदरम्यान करण्यात येत आहे.

या बारकोड प्रणालीद्वारे संबंधित घरातून कचरा संकलन झाले किंवा नाही, घरातून मिळणारा कचरा ओला-सुका असा वर्गीकृत करून देण्यात आला आहे की एकत्रित स्वरूपात देण्यात आला आहे, याबाबतची अचूक माहिती नोंदवली जात आहे. यामुळे कचरा वर्गीकरणावर प्रभावी देखरेख ठेवणे आणि सेवा अधिक कार्यक्षम करणे शक्य होणार आहे.

महानगरपालिकेमार्फत नागरिकांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व ओला-सुका कचरा वेगळा देऊन शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये