ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या महामंत्री सविता दंढारे, घुग्घुस नगर परिषदेचे नगरसेवक आशिष मासिकर, प्रविण गिलबिले, उग्रसेन पांडे, कौसर खान, सुजाता कापसे, श्यामराव लोणारे, पुण्यवर्धन मेश्राम यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांच्या हस्ते स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आणि देशभक्तीपर विचारांचा स्मरण करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमादरम्यान सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रभक्ती, धैर्य, त्याग आणि समाजजागृतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थितांनी उजळणी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये