ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुलढाणा जिल्हा लोकसहभागातून टँकर मुक्त करण्यासाठी सरसावले जिल्हाधिकारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही गावांना अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तर अनेक ठिकाणी उन्हाळ्यात टँकर शिवाय पर्याय संबंधित यंत्रणांनी उभा केलेला नाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण बुलढाणा जिल्हा हा लोकसभागातून टँकर मुक्त करण्याचा संकल्प केला आहे यासाठी संबंधित यंत्रणा प्रमुखासमोर नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी पुढील महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर प्रवीण देवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की आपल्या जिल्ह्यातील अनेक गावांना कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तर उन्हाळ्यात अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून त्यांची तहान भागवण्याचे काम संबंधित यंत्रना प्रमुखांकडून करण्यात येते. मात्र हे होत असताना वर्षानुवर्षे या गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचे नियोजन होत नसल्याने दरवर्षी कोट्यावधी रुपये या टंचाई निवारणार्थ शासनाकडून खर्च केला जात आहे यासाठी ज्या ज्या गावांना कायमस्वरूपी पाणी टंचाई भेडसावत आहे त्यांचा सखोल अभ्यास करून त्या त्या गावांना टंचाईमुक्त करण्यासाठी उपाय योजना करायचे नियोजन करण्यात येत आहे व ही सर्व कामे लोकसभातून करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगून नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, व दानशूर मंडळीचे या कामासाठी योगदान घेतल्या जाणार आहे.

यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,जलसंधारण विभाग, जीवन प्राधिकरण व पाणी टंचाई निवारणार्थ ज्या यंत्रणा ग्राम पातळीवर काम करतात त्यांचे सोबत बैठका घेऊन ज्या काही उपायोजना करायचे आहे व कायम स्वरुपी शास्वत पाण्याचे स्तोत्र उपलब्ध करायचे आहे त्यांचा सविस्तर आराखडा तयार करून कमीत कमी वेळेत काम पूर्णत्वास जाईल याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगून ज्या ज्या गावात कायमस्वरूपी पाणीटंचाई निर्माण होते त्या गावातील दानशूर व्यक्ती व नागरिकांनी व त्या भागातील लोक प्रतिनिधि यांनी यामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे लोकसहभागा मध्ये खूप ताकद असते हे या ठिकाणी दाखवून देण्याचा छोटासा प्रयत्न प्रशासनाचे वतीने करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये