वसंतराव नाईक परसबाग निर्माते राठोड परिवार लवकरच नागपूर आकाशवाणीवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराचे कार्य लवकरच नागपूर आकाशवाणीवर येणार.वनिता मंडळ,युवावाणी आणि फार्म टू सिटी अंतर्गत होणार प्रसारण.नुकतीच आकाशवाणी,नागपूर कार्यक्रम अधिकारी संगिता आरसपूरे आणि चमूची वसंतराव नाईक परसबागेला भेट झाली, चमूमध्ये प्रामुख्याने डॉ.विजयसिंह राजपूत,कार्यक्रमप्रमुख व सहाय्यक निर्देशक,अतुल साखरकर,कार्यक्रमअधिकारी व शंतनू ठेंगडी, कृषिप्रसारक यांचा सहभाग होता.भेटी दरम्यान आरोग्याच्या समस्या,कारणे आणि उपाययोजना यावर सांगोपांग चर्चा झाली, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील १३० पेक्षा अधिक प्रकारानी समृद्ध परसबागेची पाहणी करून सर्वजन मंत्रमुग्ध झाले. कु.दिपाली आणि कु. अंजली राठोड यांचे सादरीकरण झाले. राठोड परिवाराच्या समाजोपयोगी कार्याची दखल म्हणून संपूर्ण परिवाराला आकाशवाणीत पाचारण करण्यात आले.
येत्या ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.०० ते ८.३० विविध भारती नागपूरवर. तोच कार्यक्रम रात्री ८.१५ ते ८.४५ विविध भारती पुणे केंद्रावरून प्रसारीत होईल आणि १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १.०० वनीता मंडळ, आकाशवाणी,नागपूर रेडीओवरुन महाराष्ट्रभर प्रसारित होईल. राठोड परिवाराच्या आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी,आरोग्यदायी आणि दिशादर्शी कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.



