ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस महासंचालकांचा (सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी) पुरस्कारः श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलिस अधीक्षक वर्धा व संदीप कापडे सहायक पोलिस निरीक्षक यांना प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलिस अधीक्षक वर्धा हे सन २०१९ ला जळगाव जिल्ह्यात कार्यरत असतांना पोलिस स्टेशन चोपडा ग्रामीण येथे नोंद असलेला गुन्हा रजिस्टर न. ६८/२०१९ भ. ड. वि कलम ३०७, ३७६ (अ), (ब) ३५४, ३६३,३६६ (अ) ३४१, ३२३,५०६ सह कलम पॉक्सो आणि ऍट्रॉसिटी कायद्यांवये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते मात्र सौरभकुमार अग्रवाल यांनी व त्यांचे पथकाने सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषण, अचूक पुरावे आणि साक्षीदारांची भक्कम साखळी मांडून गुन्ह्याची उकल करून आरोपीला गजाआड केले. या उत्कृष्ट तपासाचे आधारे मा. न्यायालयाने आरोपिस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गंभीर गुन्ह्यांमध्ये निष्पक्ष व गतिमान तपास करून पीडितांना न्याय कसा मिळवून दिला जातो याचा आदर्श या तपासणे दाखवून दिला आहे. या दैदीप्यमान कामगिरीची मा. पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेऊन श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलिस अधीक्षक वर्धा यांना महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतिने सन २०२३ या कालावधीतील “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” हा पुरस्कार मा. अपर पोलिस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे हस्ते दि २५-०८-२०२६ रोजी प्रदान करण्यात आला.

तसेच पोलिस स्टेशन सायबर, जिल्हा वर्धा येथे तैनातीस असलेले सहायक पोलिस निरीक्षक श्री संदीप कापडे हे जिल्हा चंद्रपूर येथे नेमणुकीस असताना ५९ किलो गांजा पकडुन दोन आरोपीनविरुद्ध पो. स्टे रामनगर येथे अप क्र.६७१/२०१९ कलम २०,२२ NDPS गुन्हा नोंदवून, गुन्ह्याचा कटाक्षाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने उत्कृष्ट तपास केल्याने गुन्ह्यातिल अटक दोन्ही आरोपींना मा. न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली सदर प्रकरणाबाबत मा. पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेऊन सहायक पोलिस निरीक्षक श्री संदीप कापडे यांना सुद्धा महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतिने सन २०२३ या कालावधीतील” सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” हा पुरस्कार मा. अपर पोलिस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे हस्ते दि २५-०८-२०२६ रोजी प्रदान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये