ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत कारवाई

वर्धा शहर व पुलगाव पोलीस ठाणे हद्दीत संघटित पद्धतीने गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (MCOCA) अंतर्गत कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहर पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक १३०९/२०२६, कलम ७६, ३३३, ११५ (२), २९६, ३५१(३), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) सहकलम ४, २५ आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की फिर्यादीच्या मुलाचा आरोपी आयुष नगराळेसोबत वाद झाला होता, ज्याच्या रागातून आरोपी शादाब पठाण, आयुष नगराळे व सोहेल मोंडा यांनी घरात घुसून फिर्यादीवर हल्ला केला. शादाब पठाणने चाकूचा धाक दाखवून फिर्यादीची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तिची छेडछाड केली. फिर्यादीची मुले निरज व सुरज मध्यस्थीस आले असता आरोपींनी त्यांना चाकू दाखवून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी सार्वजनिक रस्त्यावर अश्लील शिवीगाळ करत फिर्यादीच्या कुटुंबाला धमकावले, ज्यावरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी-

१) सोहेल उर्फ आफताब उर्फ मोंडा अखिल खान, वय २६ वर्षे, रा. स्टेशन फैल

२) आयुष अजय नगराळे, वय २२ वर्षे, रा. सिद्धार्थ नगर, बोरगाव मेघे

३) शादाब खान उर्फ बेंड मुक्त्यार खान पठाण, वय ३२ वर्षे, रा. बोरगाव मेघे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक श्री. नागेशकुमार चतरकर यांनी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्यामार्फत सादर केला होता.

सदर प्रस्तावातील कागदपत्रे व आरोपींच्या गुन्हेगारी नोंदींची पाहणी केल्यानंतर मा. संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांनी मोक्का कायद्याच्या कलम २३(१) (अ) अन्वये कलम ३ (१) (ii), ३(२) व ३(४) लागू करण्यास दिनांक २४/०८/२०२६ रोजी परवानगी दिली आहे.

पुलगाव पोलीस ठाणे हद्दीतील प्रकरण

पुलगाव येथील सोमया ले-आउट परिसरातील एका चहा कॅन्टीनसमोर काही व्यक्तींनी विविध दुचाकींवर येऊन दुकानावर दगडफेक करणे, शस्त्राचा धाक दाखविणे, गल्ल्यातील रोकड घेणे तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक ६६७/२०२६, कलम ३१० (२), भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पुलगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रगटीकरण विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने खालील आरोपींना अटक केली आहे. १) रोहित नरेश नाईक २) स्वराज दिलीपराव काळे ३) उमेश मोरेश्वर बमनोटे ४) रूपेश उर्फ प्यारे मोहन हांडे तसेच भावेश डोंगरे, जीवन उर्फ जिबा लोखंडे, अनिकेत गणेशराव अहिरराव व अन्य दोन अनोळखी साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. तपासामध्ये सदर टोळीतील सदस्य मागील १० वर्षांच्या कालावधीत स्वतःच्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर करून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर टोळीविरुद्ध यापूर्वी वर्धा शहर पोलीस ठाणे व पुलगाव पोलीस ठाणे येथे विविध गुन्हे दाखल असून, संबंधित प्रकरणांमध्ये सक्षम न्यायालयाने दखल घेतलेली आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असतानाही त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात बदल न झाल्याने, वर्धा पोलीस प्रशासनामार्फत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहेत. नागरिकांची सुरक्षितता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात संघटित पद्धतीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असून, यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये