ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव उपविभागातील ४५० युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पुलगाव उपविभागातील पोलीस स्टेशन पुलगाव, देवळी, अल्लीपूर व खरांगणा परिसरातील सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे तसेच स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आज दि. २९/०८/२०२६ रोजी लक्ष्मी सेलिब्रेशन, पुलगाव येथे रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. वंदना कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांच्या पुढाकारातून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचालित प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र, राळेगाव यांच्या सहकार्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरास पुलगाव उपविभागातील पुलगाव, देवळी, खरांगणा व अल्लीपूर परिसरातील ग्रामीण भागासह पुलगाव व देवळी शहरातील अंदाजे ४५० विद्यार्थी व युवक-युवती उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र, राळेगाव येथील श्री. प्रमोद कांबळे सर तसेच राज्य समन्वयक श्री. प्रदीप कोरडे सर यांनी उपस्थित युवकांना व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण कौशल्य, पायाभूत संगणक ज्ञान, हॉटेलिंग क्षेत्र तसेच यांत्रिकी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व त्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षणाबाबत सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच डॉ. वंदना कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांनी उपस्थित युवक-विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रोत्साहित केले. युवकांनी उपलब्ध शैक्षणिक व रोजगाराच्या संधींचा योग्य प्रकारे उपयोग करून स्वतःच्या कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सदर कार्यक्रमास डॉ. वंदना अ. कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सदाशिव ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सदानंद वडतकर, तसेच श्री. प्रमोद कांबळे सर व राज्य समन्वयक श्री. प्रदीप कोरडे सर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने युवक-विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये