ताज्या घडामोडी

वृक्षारोपण करून जगन्नाथ मंडळातर्फे गुरुपौर्णिमा साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे, या संत तुकोबाच्या उपदेशाला अनुसरून तसेच पर्यावरणाची गरज ओळखून पर्यावरणाला अनुकूल अशी वृक्षलागवड हि काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्व ओळखुन स्थानिक गवराळा वॉर्ड येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळात वृक्षारोपण करुन गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

 ज्येष्ठ वयोवृध्द नागरिक श्री. नीलकंठ आत्राम व बबन जिवतोडे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे लिमेश माणूसमारे, बाबाराव निखाडे, ज्ञानेश्वर परचाके पांडुरंग कोयचाडे, महादेव डोंगे, विनोद सावनकर, विलास खापणे, सूर्यभान परचाके, प्रभाकर निमकर, महादेव उरकुडे मंगेश येरमे आदींनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. गुरुौर्णिमेनिमित्त जगन्नाथ बाबांची आरती करुन गोपाल काल्याचे वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये