नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये पिंपरी येथील प्रणय मात्रे या विद्यार्थ्याचे उत्कृष्ट प्रदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वैशाली एज्युकेशन फाउंडेशन नागपूर द्वारे संचालित अचिव्हस अबॅकस अकॅडमी नागपूर यांच्या वतीने दिनांक 14 जून 2026 रोजी रामगोपाल माहेश्वरी हाल सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेवल अभ्याकस कॉम्पिटिशन मध्ये पिंपरी पुनर्वसन आर्वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पद्मावती चौक आर्वी जिल्हा वर्धा येथील सौ प्राजक्ता सुदामा दरोही यांच्या द्वारे पिपरी पुनर्वसन आर्वी या केंद्रातील विद्यार्थी चि. प्रणय निलेश मात्रे याने चॅम्पियन पुरस्कार मिळविला त्याला स्मार्टवॉच मेडल प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
प्रियांश आशिष मांडवे याने त्याच्या लेवल मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून द्वितीय पुरस्कार मिळविला तसेच सदर स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम प्रदरषण करणारा राजापूर आर्वीतील विद्यार्थी प्रशांत दिनेश ठाकूर याला प्रोत्साहन पर बेस्ट स्टुडंन्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना यशाच्या स्वरूपात प्राप्त झाल्याने विद्यार्थी तसेच पालकांनी आनंद झाल्याचे मत व्यक्त केले अबॅकस शिक्षणाने विद्यार्थ्यांचे गणित विषयातील भीती दूर होते गणित सोडविण्याच्या क्षमतेत अतिशय वाढ होऊन आत्मविश्वास वाढते व त्याचे भविष्य उज्वल होते असे मत यावेळी अचीवर अबॅकस अकॅडमी नागपूरच्या संचालिका सौ वैशाली अनुप उल्हे यांनी व्यक्त केले व सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांचे अभिनंदन केले अशा प्रकारे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन अतिशय आनंदात व उत्साहात पार पडले



