रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांनी बल्लारशाह रेल्वे स्टेशन दोन आरोपींकडून 16 हजारावर देशी दारूचा मुद्देमाल जप्त
वीरसेन चंहादे पोलिस निरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांनी केलेली मोठी कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 19 जून 2026 रोजी सरकार तर्फे फिर्यादी नामें पोलिस शिपाई दर्शन झाडे बक्कल नंबर 1194 यांची नेमणूक रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे असून बल्लारशाह येथे ड्युटी करीत असताना आरोपी नंबर (1)भरत लल्लाकुला ओदेलू लल्लाकुला वय 26 वर्ष राहणार घर नंबर 5-2-48 पोस्ट ऑफिस बस्ती आदिलाबाद बेलमपल्ली राज्य तेलंगणा आरोपी नंबर (2) सत्तम्मा लक्काकुला वय 51 वर्ष राहणार घर नंबर 5-2-48 पोस्ट ऑफिस भरती आदिलाबाद राज्य तेलंगणा यांनी रेल्वे स्टेशन बल्लारशा प्लॅटफॉर्म नंबर 5 ट्रेन नंबर 12511 राप्तीसागर एक्सप्रेसच्या मागील जनरल कोच जवळ आरोपी नंबर (1) कडे एक बॅग व पिशवीमध्ये 90मिली लीटरचे प्लास्टिक सिलबंद राॅकेट संत्रा देशी दारू एकुण 200 नग प्रति बाॅटल किंमत 40 रुपये प्रमाणे एकुण किंमत 8,220/- रुपये व आरोपी नंबर (2) कडे दोन वेगवेगळ्या पिशवीमध्ये राॅकेट देशी संत्रा कंपनीचे 90 मिली लीटर चे 200 नग किंमत 8,030/- रुपये एकुण दोन आरोपीकडून मिळालेल्या देशी दारूचा मुद्देमाल एकुण किंमत 16,250/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आणि दोनही आरोपींवर रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे आरोपींवर अपराध क्रमांक 161/2026 कलम 65 (अ)66(ब)मदाका कलम दाखल करण्यात आला आहे आणि दोनही आरोपींना सुचनापत्रा सोडण्यात आले ही पोलिस निरीक्षक वीरसेन चंहादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई दर्शन झाडे राजेंद्र फंटींग पुढील तपास पोलीस नायक संजय सुखदेवे बक्कल नंबर 583 रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा अंतर्गत ओपी बल्लारशाह हे करीत आहे.



