ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूस ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

घुग्घूस :_ नगर परिषद स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती नूरूल रियाजुल हसन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देऊन घुग्घूस येथील ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घूसमध्ये ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, अद्यापही हे रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घुग्घूस हे मजूरवर्ग, लहान व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे शहर असून, गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी नागरिकांना सुमारे २५ किलोमीटर अंतरावरील चंद्रपूर येथे जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर घुग्घूस येथील ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करून नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सभापती नूरूल रियाजुल हसन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये