ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
युवा व्यावसायिक अभिषेक पाथ्रीकर यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. सुभाष पाथ्रीकर व महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सोनुर्ली येथील सेवानिवृत्त प्राचार्या प्रतिभा पाथ्रीकर यांचा एकुलता एक मुलगा, गडचांदूर जेसीज चे माजी अध्यक्ष, युवा व्यावसायिक अभिषेक उर्फ बंटी पाथ्रीकर, वय 35 वर्ष यांचे अल्पशा आजाराने 19 जुन रोजी निधन झाले, अंत्यसंस्कार अकोला येथे आज 20जुन रोजी अतिशय शोकाकूल वातावरणात पार पडले,
त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, एक मुलगा तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.
अभिषेक हा मनमिळाऊ स्वभावाचा आणि होतकरू होता, युवा वर्गात लोकप्रिय झाला होता,त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



