सेलू पोलीस ठाणेची दमदार कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 18/06/2026 रोजी सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. पंकज वाघोडे व त्यांचा पोलीस स्टाफ यांनी शिवारातील स्मशानभुमी जवळ 1) 4 लोखंडी ड्रममध्ये 180 लिटर प्रमाणे 720 लिटर कच्चा मोहा रसायन सडन लिटर 200/-रु. प्रमाणे किमत 144,000/-रु 2) 4 लोखंडी ड्रम प्रती ड्रम 2000/-रु. प्रमाणे 4,000/- रु. 3) एका प्लास्टीक डबकी मध्ये 18 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 300/-रु. प्रमाणे 5400/-रु. 4) एक प्लास्टीक डबकी 200/-रु. असा एकुण जुमला किमंत 1,57,600/-रु. चे गावठी दारु भट्टीचे साहीत्य जागीच नाश करण्यात आला आरोपी संदिप उडान रा. खापरी याचेवर पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच जयपुर शेतशिवारातील बोर नदीच्या काठावर 1) 1 लोखंडी ड्रममध्ये 200 लिटर कच्चा मोहा सडवा प्रती लिटर 200/-रु. प्रमाणे किमत 40,000/-रु 2) 1 लोखंडी ड्रम किं. 2000/-रु. 3) 4 प्लास्टीक ड्रममध् लिटर प्रमाणे 400 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रती लिटर 200/-रु. प्रमाणे किमत 80000/-रु 4)4 प्लास्टी कि.4000/-रु. असा एकुण जुमला किमंत 1,26,000/-रु. चे गावठी दारु भट्टीचे साहीत्य मिळुन आल्याने जागीन करण्यात आले अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई दरम्यान एकुण जुमला किमंत 2,83,600/-रु. चे गावन भट्टीचे साहीत्य जागीच नाश करण्यात आला. सदर कारवाई मुळे अवैद्य दारुवाले आरोपीमध्ये दहशदीचे वातावरण झाले आहे.
सदर ची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल सा., अपर पोलीस अधीक्षक मा.सा वाघमारे, मा. प्रमोद मकेश्वर उपविभाग वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलू चे ठाणेदार पंकज वाघोडे व स्टाफ प्रंशात श्रीवास्तव, शरद इंगोले, सचिन वाटखेडे, विनायक गोडे नेमणुक सेलू पोलीस स्टेशन तसेच खापरी पोलीस पाटील नम्रता गव्हाळे यांनी केली आहे.



