चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 22.06.2024 रोजी पो.स्टे. वर्धा शहर हद्दीत येथे प्रो. रेड केला असता एकूण 1,19,140/-₹ चा माल जप्त केला असून पो.स्टे. – वर्धा शहर घटनास्थळ वडर वस्ती महिला आश्रम वर्धा येथून आरोपी – दिलिप माणिक लक्षर वय 42 वर्षे रा. वडर वस्ती महिला आश्रम वर्धा तसेच मुद्देमाल – 1) 500 ml चे टुबर्ग व किंगफिशर कंपनीचे बियर ने भरलेल्या 38 कॅन प्रती की.500/-₹ नुसार 19,000/-₹ 2) 90 ml चे टांगो कंपनीचे देशी दारू ने भरलेल्या 2 बॉटल्स प्रती की.70/-₹ नुसार 140/-₹ 3) एक हिरो स्प्लेंडर मोटासायकल क्र. MH 32 AP 3021 किंमत 60,000/- 4) एक हायर कंपनीचा डीप फ्रिझर किंमत 30,000/-₹ 5) एक अँड्रॉइड मोबाईल फोन किंमत 10,000/-₹ अशा एकूण 1,19,140/-₹ चा माल जप्त करण्यात आला.
आरोपी व मुद्देमाल पो.स्टे. वर्धा शहर स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर,सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा यांनी तसेच पो.स्टे. वर्धा शहर यांचे स्टाफ सह केली.