ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

      आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांनी आपल्या आवडीच्या व्यवसाय क्षेत्रात प्रवेश घेऊन त्या संबंधित कौशल्ये विकसित केल्यास स्वावलंबी जीवन जगता येते, असे प्रतिपादन शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांनी बल्लारपूर केले.

      शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर यांच्या वतीने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शास. औ. प्र. संस्था, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल, सर्व शाळा, महाविद्यालय, खाजगी आय.टी.आय., एम.सी.व्ही .सी., इतर शैक्षणिक संस्था व शिकवणी वर्ग यामधील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन करण्यासाठी गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृह कलामंदिर येथे एक दिवसीय छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित करण्यात आले होते.

   सदर शिबिराचे उद्घाटन आ. सुधाकर अडबाले यांचे हस्ते थाटात संपन्न झाले.

   प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी तहसीलदार सतीश साळवे, मधुसूदन रुंगठा, अध्यक्ष फेडरेशन ऑफ इंडस्ट्री असोसिएशन विदर्भ, संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे, प्राचार्य कल्पना खोब्रागडे शास.औ.प्र.संस्था (मुलींची) चंद्रपूर ,प्रज्योत नळे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

    मार्गदर्शन सत्रामध्ये प्राचार्य राजकुमार हिवाळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांनी दहावी व बारावी नंतर काय? व त्यानंतरच्या शिक्षणाच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले. चंद्रपूर औ प्र.संस्थेचे गटनिदेशक बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले तर एस आर एम महाविद्यालयाचे प्रा.नितीन रामटेके आणि डॉ . किरणकुमार मनुरे यांनी मुलाखतीचे तंत्र विषयावर मार्गदर्शन केले. रजत कांबळे, समाज कल्याण कार्यालय यांनी समाज कल्याण विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मुकेश मुंजनकर, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक यांनी कौशल्य विकास अंतर्गत आलेल्या विविध योजना विषयक माहिती दिली.तसेच अमित बोडे जिल्हा समाज कल्याण कार्यालय व श्रीमती शालू भरत, जिल्हा उद्योग केंद्र ह्या सुद्धा उपस्थित होत्या.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजरत्न वानखेडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन आर. जी. काळे व सौ. गायत्री सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. एम. खोब्रागडे यांनी केले.

    सदर शिबिराला बल्लारपूर मतदारसंघातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच पालक वर्गांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक एस.व्ही.कळसकर, गटनिदेशक श्रीमती मानकर तसेच सर्व शिल्पनिदेशक, निदेशक, कर्मचारी वृंद व संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये