शास. औ. प्र.संस्थेत जागतिक योग दिवस संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन कर्मशाळेत करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर.बी. वानखेडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध योगपटू सौ. प्रतिभा रोकडे , गटनिदेशक जितेंद्र टोंगे, सौ. सुचिता झाडे, प्रविण बोकडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो चे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले. तर सौ. प्रतिभा रोकडे यांनी योग प्राणायामाचे महत्त्व प्रात्यक्षिके द्वारा समजावून सांगितले. सूत्रसंचालन उज्वल कोठारकर यांनी केले तर आभार कु. रिया पिपरीकर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे कर्मचारी प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.