Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमेया स्केटिंग अकादमीने 13 पदके जिंकली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सुमित स्केटिंग क्लब बल्लारपूर यांच्या वतीने महानगरपालिकेच्या स्केटिंग मैदानावर 23 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत अमेया स्केटिंग अकादमीने 13 पदके पटकावली. चंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील एकूण 100 हून अधिक स्केटर सहभागी झाले होते. अमेया स्केटिंग अकादमीच्या 13 स्केटर्सनी सहभाग घेतला.

अमेया स्केटिंग अकादमीने 5 सुवर्ण पदके आणि 6 रौप्य पदके 2 कांस्य पदके जिंकली. ‘मनधन बुलबुले, आदिस्थान नागराळे, तश॔ अरोरा, अल्वीन वाबिटकर, अथर्व राखुंडे यांनी सुवर्णपदक तर रुद्र कुळमेथे, अमीन शेख, कार्तिक ठक्कर, आया॔ भवसागर, धेरया वरफेडे, देवांश यांनी रौप्यपदक तर नक्ष वैरागडे, रीयांश यांनी कांस्य पदक पटकावले.

सर्व नामांकित स्केटर्स आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार विजेते आतिश धुर्वे (मायकेल सर) यांचे त्यांच्या पालकानी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये