ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पक्षात गटबाजीला थरा नाही, पक्ष बांधणीस प्रथम प्रधान्य – खासदार अरविंद जी सावंत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानीय शिव वैभव कार्यालयामध्ये दिनांक 22/5/2024 ला सकाळी बारा वाजता शिवसेना वर्धा जिल्ह्यातर्फे मेळावा घेण्यात आला त्याप्रसंगी नवनिर्वाचित तिसऱ्यांदा निवडून आलेले पूर्व विदर्भाचे नेते खासदार अरविंद सावंत साहेब विदर्भाच्या दौऱ्यावर असताना वर्धा मध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. त्याप्रसंगी सर्व स्थानिक पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वर्धा जिल्ह्याचे शिवसेना पदाधिकारी तुषार देवढे यांनी आपल्या परिवारातर्फे शिवसैनिका समवेत साहेबांचे औक्षवंन करून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले.

याप्रसंगी शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, सारंग ताई पुरी पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, कांचन ताई ठाकूर संपर्कप्रमुख महिला आघाडी वर्धा जिल्हा, उत्तम जी आईवळे सह संपर्कप्रमुख हिंगणघाट विधानसभा, प्रफुलजी भोसले सहसंपर्क वर्धा विधानसभा,जिल्हाप्रमुख आशिष पांडे,तुषार देवढे, अर्चना देवढे, युवती सेनाप्रमुख अवंतिका शेंडे किशोर धोंगडे,भैय्यासाहेब गावंडे ,प्रमोद पांडे, खुशाल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजित मेळाव्यात बोलताना खासदार रवींद्र सावंत साहेबांनी पक्ष संघटन वर्धा जिल्ह्यामध्ये कसे मजबूत होईल यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मानच होईल गद्दारांना थरा नाही शिवसेना पक्षात गटबाजी करून राजकारण केल्यास शिस्तभंगाची कारवाई करून गय केल्या जाणार नाही पेरणीच्या हंगामावर शेतकऱ्यांना मदत करणे, बियाणे सीड्स कंपनी निर्माता आणि विक्रेता यांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन जसे सोयाबीन,कापूस यामध्ये गुणवत्ता, उगवण क्षमता नसणारे बोगस बियाणे देऊन भ्रष्टाचार मांडलेला आहे या विषयावर शिवसैनिक पदाधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.शासनाच्या योजना त्यांना सांगून योग्य मार्गदर्शन करून न्याय देणे,महिलांच्या कामासाठी धावून जाणे जनसेवा करून सामाजिक बांधिलकी शिवसैनिक नेहमी जोपासत आलेला आहे या माध्यमातून वर्धा जिल्हा मजबूत करावा, तसेच शिवसेनेमध्ये गटबाजीला थारा नाही शिवसैनिका पेक्षा कोणतेही मोठे पद नाही आपण सर्वांनी मिळून पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे हात मजबूत करावे संपूर्ण शिवसेना,महिला आघाडी,युती सेना,युवासेना यांनी मिळून एकोप्याने काम केल्यास वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमदार निवडून येणार यात यत्किंचितही शंका नाही असे प्रतिपादन यावेळी खासदार अरविंद सावंत साहेबांनी मार्गदर्शन करते वेळी केले.

यावेळी अशांक कावळे, रंजीत युवनाते, मधुकरराव दहिकर त्रिंबकराव खुळे रामभाऊजी चौधरी शिवाजीराव टाले सुधीर भाऊ देशमुख सुधाकरराव देशपांडे संजयजी शेंडे सतीश उईके चंदू नितनवरे मनोज आत्राम निलेश मिश्रा कान्हा धोंगडे महेश शास्त्री संतोष दवे अमर दांदडे ,अमित शेंद्रे, मोहन निंबाळकर गौरव भिलारे अविनाश जांभुळकर नानाजी जांभुळकर नाना दप्तरी गुगल वानखेडे सचिन मून सचिन देवढे, दीपक दहेकर उमेश नेवारे, जॉन टी कहाते, इमरान खान, पवन मून सतीश देवढे, श्याम देशमुख शाखाप्रमुख, प्रमोद देवढे , देवा राठोड, आकाश नर्सिंग पुरकर, विजय भोयर हरीश चौधरी संदीप चौबे बालू वसु तेजस भागवते, अर्जुन राठोड,प्रवीण कोटरंगे, विनोद घवघवे, पुंडलिक चौधरी, प्रतीक मांडले, महेश झाटे महेंद्रसिंग ठाकूर सुरजित सिंग ठाकूर शशी मून इत्यादी शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये