ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जन्मभूमी करंजीला स्वच्छ, समृद्ध व विकसित आदर्श गाव करणार – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार 

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते १.७९ कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जन्मभूमी असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काळात १.७९ कोटींच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करून दिला होता. त्या विकासनिधीतून पूर्णत्वास आलेल्या विकास कामांचे लोकार्पण विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांना प्रतिसाद देत रस्ते, गटारी, गुरुदेव सेवा मंडळ सभागृह, बौध्द विहार बांधकाम आदी कामांचा यात समावेश आहे.

तत्पूर्वी करंजी गावचे सुपुत्र विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांचे करंजी गावात आगमन होताच ढोलताशांच्या गजरात भव्य आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले.

आयोजित लोकार्पण व कर्तृत्वाचा सन्मान कार्यक्रमास माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर वडेट्टीवार, करंजी सरपंच सरिता पेटकर, माजी उपसभापती तुकेश वानोडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक रेचणकर, देविदास सातपुते कमलेश निमगडे, प्रदीप खोब्रागडे, सारनाथ बक्षी , मारोती चिचघरे, अशोक चिचघरे, ज्योती चिचघरे,आशिष निमगडे, सुरेश श्रीवासकर, श्रीनिवास कंदनुरीवार, महेंद्र कुणघाडकर, राजू झाडे, प्रवीण निमगडे, यांचेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधतांना विधिमंडळ पक्षनेते आ. वडेट्टीवार म्हणाले की, करंजी गावाशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत.या मातीत मी जन्माला आलो आणि मला येथील जनतेने प्रेम दिले.आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच मला राजकीय क्षेत्रात राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. आपला अतूट विश्वास आणि अपार प्रेम याचा मी सदैव ऋणी असून करंजी गावाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी नसून कर्तव्य आहे. सोबतच समाजाची सेवा माझ्या हातून घडत आहे हेच माझ्या जीवनाचे सार्थक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

तर माजी आमदार सुभाष धोटे यांनी विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांच्या संघर्षमय जीवनाच्या खडतर प्रवासाची माहिती आपल्या भाषणातून विषद केली. तर वडिलांचे कर्तृत्व त्यांचा करण्यात आलेला सन्मान आणि गावकऱ्यांचा अतूट विश्वास पाहून मन पूर्णतः भारावले असून आपल्या प्रेम व विश्वासाला वडेट्टीवार कुटुंबियांकडून कधीही तडा जाणार नाही असा विश्वास प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आ. वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त करत विकासाच्या या वाटचालीला कायम पाठिंबा देण्याचा विश्वास व्यक्त केला.

मतदारसंघात विकासाची ही गती कायम ठेवत आगामी काळात आणखी निधी आणून विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये