ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ नगर परिषद महानगरपालिका शिक्षक संघाचे नागपूर येथे आंदोलन सुरू

माधुरी सावरकर उपसंचालक नागपूर विभागाचे यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

विदर्भातील नगर परिषद महानगर पालिका शिक्षक संघांचे अध्यक्ष प्रमोद देशमुख नागपूर व मंगेश अंबादे चंद्रपूर दिनकर लेमाडे उमरेड मोहिनूर रहमान अमरावती सोहेल नसीम कामठी रमेश कोंबे, चौधरी,मेंढे, पिसे, पोहणे,जमाने, कळसकर, वानखेडे,इटनकार, श्रीमती मोहोड मॅडम,चलाख,डफरे बाबू,तेलरांधे,चिकटे ,कु.वरकड, श्रीमती ताडाम, काकडे, निगडे सालेकर, श्रीमती भगत, डी.एस.मोरघळे गोंदिया न.प.हे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून नागपूर येथे आंदोलन करीता बसलेले आहेत यांच्या मागण्या (1)शिक्षकांचे वेतन व पेन्शन दर महिन्याच्या 1 तारखेला देण्यात यावे.(2)2022 पासून सेवानिवृत्त शिक्षकाचे उपदान त्वरित द्यावे (3) प्रलंबित मेडिक्लेम बिले मंजूर करून महानगरपालिका पाठवावित (4) वरिष्ठ व पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करून आदेश द्यावेत (5) शिक्षक सेवकांची थकबाकी त्वरीत द्यावी (6) एकस्तर व चटई क्षेत्राची त्वरीत द्यावी . या निमित्ताने आंदोलन सुरू करण्यात आले असून 8 दिवस लोटले गेले असून एका ही अधिकारी आंदोलन स्थळी भेट देण्यास पण आले आज दिनांक रोजी नागपूर येथील सौ.माधुरी सावरकर शिक्षक विभागाच्या उपसंचालक यांना शिक्षकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये