श्री व्यंकटेश महाविद्यालयात शिवजयंती निमित्त व्याख्यान मालेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय शिव व्याख्याते उद्धव शेरे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी अतिथी म्हणून डॉ. संजय बोडखे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्धव शेरे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासावर प्रकाश टाकला. छत्रपतींनी पराक्रम गाजवला त्यामुळे आपण अभिमानाने इतिहासाची महती गाऊ शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गोरे यांनी सद्यस्थितीत छञपती शिवाजी महाराजांच्या तसेच विविध महापुरुषांच्या विचारांची आवश्यकता पटवून दिली. या कार्यक्रमात आविष्कार मधुकर जाधव याने बाल शिवबाचा पेहराव करून ॲड. विशाल मस्के यांची होय, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ही दीर्घ कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. गजानन तांबडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कवी रमेश नरोडे, रमेश बनकर, बाहेकर, सौ. वैशाली तिडके यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



