ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे विचार आजच्या आजच्या युवा पिढीने आत्मसात करून व्यसनमुक्त व्हावे _ ह भ प निकम गुरुजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी संपूर्ण जीवन समाज हितासाठी खर्च करून, समाजातील अनिष्ट परंपरा, अंधश्रद्धा, दूर करण्याचा प्रयत्न केला, स्वच्छतेचा संदेश दिला, आजच्या युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त व्हावे असे आवाहन ह भ प निकम गुरुजी यांनी विरंगुळा भवन देऊळगाव राजा येथे संत गाडगे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात केले

 देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प.निकम गुरुजी , वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड वजेष्ठ नागरिक संघटना चे कार्याध्यक्ष प्रा.विनायकराव कुळकर्णी होते, सर्वप्रथम संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रकाश अहिरे, प्रा.विजयकुमार रायमल,प्रा.अशोकराव डोईफोडे, रमेश नरोडे, पंडितराव पाथरकर,बाबुलाल शिवरकर, नंदलालजी शर्मा हे उपस्थित होते

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गोविंद बोरकर यांनी केले .शेवटी ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदानने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये