लाडज येथे शिवजन्मोत्सव सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- लाडज (ता. ब्रह्मपुरी) येथे शिवआदर्श मित्र मंडळ लाडज जुनी यांच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून ब्रह्मपुरी येथील बुद्ध–शिव–फुले–शाहू–आंबेडकर विचारवंत व युवा सामाजिक कार्यकर्ता माननीय विहार मेश्राम यांनी जाहीर व्याख्यान दिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आजच्या युगातील महत्त्व अधोरेखित करताना स्वराज्य, न्याय, धर्मनिरपेक्षता, स्त्रीसन्मान आणि सुशासन या मूल्यांची आजच्या समाजात अंमलबजावणी कशी करता येईल यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी व विचारप्रवर्तक भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गिरीधर लेनगुरे सर (प्रगतशील शेतकरी), डाकराम आदे, भोजराज नंदागवळी (सरपंच, लाडज), चांदेवार मॅडम, दौलत गुरनुले सर (माजी सरपंच, लाडज), नंदलालजी राऊत, अलकाताई अलोने (उपसरपंच), श्रीरामजी दोनाडकर सर (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), दिनेशजी ठलाल, अशोक तूपटे, अनिलजी ढवळे (ग्रामपंचायत सदस्य), केवळरामजी राऊत सर, विनोदजी मेश्राम सर, मनोहर वाडगुरे, विकासजी वाडगुरे, नेवजाबाई हितकरणी ब्रम्हपुरी, गोपाल चांदेकर, पंकज साखरे (संगणक परिचारक, ग्रामपंचायत लाडज) आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने गावात सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिवआदर्श मित्र मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.



