ताज्या घडामोडी

गोवंश तस्करीवर मोठी कारवाई – तब्बल 74 गोवंशाची सुटका तर 4 बैलांचा मृत्यु

पोलीस व बजरांगदलाच्या कार्यकर्त्यांना मोठे यश

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही गोवंश हत्या व गोवंशाची परराज्यात अवैध तस्करी सुरूच असुन वारंवार कारवाई होऊनही तस्करीच्या घटनांत म्हणावी तशी घट होत नाही तरीही हिंदुत्ववादी संघटना पोलिसांना ह्या कमी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून गोवंश तस्करीच्या घटनांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत असतात. ह्याचाच एक भाग म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंशाची अवैध वाहतूक हाणुन पाडत 48 गोवंशाची सुटका केली मात्र त्यापैकी 4 गोवंश मृतावस्थेत आढळून आले.

सविस्तर वृत्त असे की, बुधवार दिनांक 28/06/2023 रोजी गुप्त माहिती नुसार चंद्रपूर मार्गे दोन ट्रक अवैधपणे गोवंश घेऊन येत असल्याची माहिती मिळताच बजरंग दलाच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने त्या ट्रकचा पाठलाग केला. दुपारी 12:30 वाजता पडोली जवळ एक दहाचाकी ट्रक थांबविण्यात येऊन झडती घेतली असता त्यात तब्बल 48 बैल  आढळून आले त्यातील चार बैलांचा मृत्यु झाला होता.

पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयावरून दुसऱ्या ट्रकचा पाठलाग करून बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे ट्रक अडवून तपासणी केली असता त्यात 30 गायी आढळून आल्या. पोलिसांनी कायदेशीर कारवाई पुर्ण करुन 44 बैल व 30 गाई अशा एकुण 74 गोवांशांना जीवनदान देऊन त्यांची रवानगी पुढील पालन पोषणासाठी लोहारा येथिल उज्ज्वल गोरक्षण केंद्रात दाखल करण्यात आले व तस्करी साठी वापरण्यात आलेले ट्रक कारवाईकरीता जप्त करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले मात्र दोन्ही ट्रक चे चालक व त्यांचे सहकारी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये