ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोस्टे अंतर्गत दारू पिवुन दारूच्या नशेत वाहन चालविणा-या चालक यांचेवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ अॅनीलाइझर सह संपुर्ण वर्धा जिल्हयात दि. 28/06/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 28/06/2026 रोजी वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील अंमलदार यांनी दोन केसेस केल्या आहे त्यामध्ये आरोपी क.1) जगदीश राजेंद्र तिवसकर वय 30 वर्ष रा. तुकाराम मठ वर्धा 2) सुनिल बबनराव उके वय 52 वर्ष रा. सिंदी मेघे यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंद केला. तसेच इतर पोलीस स्टेशन ने देखील खालील प्रमाणे केसेस केल्या आहे.

1) पोस्टे समुद्रपुर यांनी 185 मोवाका च्या तीन केसेस केल्या आहे. त्यामध्ये आरोपी क 1) अर्जुन विठ्ठलराव खुरवडे वय 55 वर्ष रा. समुद्रपुर, 2) राजु भेयर वय 35 वर्ष रा. ईटलापुर ता. समुद्रपुर, ३) दिशांत त्रंबकराव किन्नाके वय 35 वर्ष रा. समुद्रपुर

2) पोस्टे वडनेर यांनी 185 एक केस केली आरोपी क 1) रोशन हंसराज नन्हवरे वय 32 वर्ष रा. समुद्रपुर, 3) पोस्टे सेलु यांनी 185 एक केस केली आरोपी क. 1) योगेश वसंतराव खंडाळे वय 36 वर्ष रा. केळझर, 4) पोस्टे देवळी यांनी एक केस केली आरोपी क 1) आकाश अशोकराव कटींग वय 28 वर्ष रा. देवळी, 5) पोस्टे पुलगाव यांनी एक केस केली आरोपी क 1) विवेक राजेंद्र खाडे वय 41 वर्ष रा गुंजखेडा पुलगाव

अशा दारू पिवुन वाहन चालविणा-या वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंद केले. वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकुण 172 केसेस, एकुण लायसन्स. निलंबन प्रस्ताव 59 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 2427 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66(1)/192(अ) एकुण 100 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये