ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह व ऑल आउट मोहिमेदरम्यान रामनगर पोलिसांची कारवाई

सार्वजनिक ठिकाणी गांजा पिणाऱ्या तिघांना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह आणि ‘ऑल आउट मोहिमे’ अंतर्गत वर्धा जिल्हा पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, रामनगर पोलीस स्टेशनच्या दारूबंदी पथकाने रविवारी (दि. २८) दुपारी गौरक्षण वार्ड येथील रेल्वे क्वार्टर सार्वजनिक वाचनालयाजवळ छापा टाकून सार्वजनिक ठिकाणी गांजा (अमली पदार्थ) सेवन करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहात अटक केली आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याचे दारूबंदी पथक ‘ऑल आउट मोहिमे’ अंतर्गत पेट्रोलिंगवर होते. यादरम्यान पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, गौरक्षण वार्ड येथील रेल्वे क्वार्टर सार्वजनिक वाचनालयाच्या आडोशाला काही तरुण गांजा ओढत बसले आहेत. माहिती मिळताच दारूबंदी पथकाने दुपारी ०१:१५ ते ०२:१५ वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी अचानक छापा (रेड) टाकला. यावेळी राजेश नंदकिशोर बडसर, वय ३४ वर्ष, रा. सानेवाडी, वर्धा, कार्तिक दीपक सगळे, वय २७ वर्ष, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा, किसना अमर पसेरकर वय २० वर्ष, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा हे तीन आरोपी सार्वजनिक ठिकाणी गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळील एका प्लास्टिकच्या छोट्या पाऊचमध्ये गांजा सदृश वनस्पती किंमत २०० रुपये, गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चिलम (पुंगळी) (किंमत १५० रुपये) गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी कापडी चिंधी (छापा) चाबी छाप माचिस डब्बी (किंमत ५ रुपये) एकूण जप्त मुद्देमालः ३५५/- रुपयेमुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ५९८/२०२६, कलम ८ (क), २७एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची धडक कारवाई मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस ठाणेची निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम यांच्या निर्देशानुसार पोलिस अंमलदार अवि बनसोड, मनोज भोमले, मुकेश वांदिले, विकी अणेराव, महिला पोलीस अंमलदार कांचन कौरती यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये