ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई

६९ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस अधीक्षक वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दिनांक २८/०६/२०२६ रोजी पहाटे १७.०० वा. ते २२.०० वाजे पर्यंत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व १९ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने सहभाग नोंदवला. मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्री, अमली पदार्थ (NDPS), शरीरविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईत गुन्हे सराईत आरोपीतांवर ४१ दाखल करण्यात आले असून एकूण ६९,७७,९१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईचा संक्षिप्त तपशीलः

अवैध दारू विक्री: 41 कारवायांमध्ये एकूण ५,३७,६५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त.

NDPS (अमली पदार्थ): 11 आरोपीतांना चेक केले असता सर्व आपापले घरी हजर मिळून आले. एन.डी.पी.एस. कायद्यान्वये पो. स्टे हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीतांकडून १ किलो ७५ ग्रॅम गांजा व इतर याप्रमाणे ३,०९,८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपी अटक करण्यात आले आहेत.

पाहिजे/फरार आरोपीः ५८ पाहिजे आरोपी आणि ८ फरार आरोपींचा शोध घेण्यात आला.

जुगारः ५८ आरोपीतांना चेक केले असता ३३ गुन्हेगार हजर मिळून आले व एका गुन्हेगाराविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आर्म्स अॅक्टः १२१ आरोपीतांना चेक केले.

इतर कारवायाः कलम ५५,५६ म. पो. का अन्वये हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार चेक तसेच MPDA मधून सुटलेले २० गुन्हेगार

चेक केले. गुन्हेगार चेक करण्यात आले असून स्थानिक पोलीस स्टेशन लक्ष ठेवून आहे.

तसेच जिला वाहतुक शाखेकडुन महत्वाचे ठिकाणी नाकाबंदी करून मोटर वाहन कायद्यान्वये ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच इतर कारवाई करण्यात आली. सदर ऑपरेशन ऑल आऊट मोहीममध्ये जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा असे एकूण ४२ अधिकारी आणि २४२ अंमलदारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

भविष्यातही जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अवैध कृत्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये