चारचाकी वाहनाने गावठी मोहा दारूची वाहतुक करनार्यावर कार्यवाही
सात लाख अट्टेचालीस हजार शंभर रुपये 7,48,100/रु चा. मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्याची हकीकत या प्रमाने आहे की, दि. 29/06/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट चे गुन्हे शोध पथक हे पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील अवैद्य दारू विक्रत्यावर कार्यवाही करने करीता पेट्रोलीग करीत असता मुखबीर कडुन खबर मिळाली की, एक ईसम त्याचे ताव्यातील पांढ-या रंगाच्या बलेनो कार क्रमांक एम.एच. 32/ ए.एक्स. 0271 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करीत वर्धा ते हिंगणघाट रोडने हिंगणघाट येथे येत आहे.
अशा माहीती वरून नांदगाव चौरस्ता हिंगणघाट येथे बॅरिकेटिंग करुन नाकेबंदी करीत असताना खबरे प्रमाणे एक पांढ-या रंगाची कार क्रमांक एम.एच. 32/ ए.एक्स. 0271 आली. सदर कार चालकास पोलीस स्टॉफच्या मदतीने थावंण्याचा ईशारा करताच कार चालकाने वेग वाढवुन वेदरकारपणे वाहन चालवीत संत कबीर वार्ड, हिंगणघाट कडे निघुन गेला. वरून आम्ही सदर कारचा संत कबीर वार्ड, हिंगणघाट येथे शोध घेत असताना समता बौध्द विहाराचे समोरील गल्लीत एक पाढ-या रंगाची कार दिसुन आली. आम्ही कार कडे जात असताना एक ईसम सदर ठिकाणा वरुन गल्ली बोळात पळुन गेला. सदर कारची पाहनी केली असता सदर कार मध्ये 16 प्लॉस्टीक डबक्यात गावठी मोहा दारू मिळुन आल्याने मौका जप्ती पंचनाम्या प्रमाने 1) मोठ्या 14 प्लास्टीक डबक्यांमध्ये प्रती 20 लिटर प्रमाणे 280 लिटर गावठी मोहा दारु प्रती 150/ रु प्रमाणें 42,000/रु. 2) लहाण 2 प्लास्टीक डबक्यांमध्ये प्रती 10 लिटर प्रमाणे 20 लिटर गावठी मोहा दारु प्रती 150/रु. प्रमाणे 3,000/रु. 3) मोठ्या 14 प्लास्टीक डबक्या प्रति 250/ रु प्रमाणे 3,800 रु व 2 लहाण प्लास्टीक डवक्या प्रति 150/ रु. प्रमाणे 300 रु. असे एकुण 3,100/रु. 4) एक पांढ-या रंगाची मारुती कम्पनीची बलेनो कार क्रमांक एम.एच. 32/ ए.एक्स. 0271 अंदाजे किमंत 7,00,000/ रु असा एकुण जुमला किमत 7,48,800/ रु चा. मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने जप्त करून पसार आरोपी बलेनो कार क्रमांक एम.एच. 32/ ए.एक्स. 0271 चा चालक याचे विरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये व मोटार वाहण कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे. पसार आरोपी बलेनो कार क्रमांक एम.एच. 32/ ए.एक्स. 0271 चा चालक याचा शोध घेत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब श्री. सौरभ कुमार अर्गवाल, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिवी वाघमारे साहेब, उप. विभागीय पोलीस अधिकारी साहेब श्री. सुशिल कुमार नायक यांचे मार्गदर्शनात व पो. नी. श्री. अनिल राऊत पो. स्टे. हिंगणघाट यांचे निर्देशान्वये गुन्हे शोध पथकाचे सफौ. रहीम शेख, पोहवा श्रीकांत खडसे, दिनेश तुमाने, जगदिन चौव्हान पो. अम. प्रमोद जाधव, राजु ढगे. यांनी केली
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, हिंगणघाट



