ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपंचमीनिमित्त भद्रावती शहर व तालुका काँग्रेसकडून महाप्रसादाचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              विदर्भातील एकमेव नागमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भद्रावती येथील श्री भद्रनाग मंदिरात नागपंचमी उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर भद्रावती शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेसचे नेते प्रवीण भाऊ काकडे आणि भद्रावती शहराध्यक्ष भूपेश कायकर यांच्या नेतृत्वात सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी गोदावरी अर्बन बँक, गांधी चौक, भद्रावती येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि प्रवीण काकडे यांच्या हस्ते भाविकांना भक्तिभावाने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. नागपंचमीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाला काँग्रेसचे भद्रावती तालुकाध्यक्ष सुमित मुडेवार, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, माजी शहराध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुनील नामोजवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सरिताताई सूर, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेविका पल्लवी तामगाडगे, नगरसेविका उषाताई जाधव, नगरसेविका सीमाताई पवार, नगरसेविका कल्पनाताई मुसारी, प्रीतीताई गणवीर, कल्पना मत्ते, रितेश वाढई, बाबूभाई सय्यद, अमोल दौलतकर, संदीप चटपकर, आशिष कार्लेकर विनोद

 मूडपल्लिवार, ईश्वर निखाडे, अशोक येरगुडे, आशिष देहारकर, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपंचमीच्या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी धार्मिक व सामाजिक उपक्रमातून जनतेशी संवाद साधला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये