जगातील छायाचित्रन दिनानिमित्त फळ वाटप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- १९ आगस्ट २०२६ जागतिक छायाचित्रण दिनानिमित्य ब्रम्हपुरी तालुका छायाचित्रकार संघटना ब्रम्हपुरीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय व्रम्हपुरी येथे सामाजिक दायित्व म्हणून रुग्णाना फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सर्व जगामध्ये १९ आगस्ट हा दिवस सर्व फोटोग्राफर जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करतात. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कामडी सर, डॉ. ढोंगे सर तथा संघटनेचे बंटी येरावार, निलेश उरकुडकर, क्रिष्णा ठाकरे, अजय पंचभाई, विलास कुथे, केशिप पाटील, शुभम भोयर, हिमालय ठाकरे, सौरभ पेंदाम, मुलचंद धोटे, प्रमोद नाकतोडे, कुणाल मुंडे, वैभव नागदेवते, ज्ञानेश्वर कोसरे, लोकेश शिवरकर, मदन रामटेके, निकेश पानसे, आकाश रामटेके, आशिष निकुरे, चिराग खेडकर, दत्ता येरावार, आशिष घाटूरकर तथा ब्रम्हपुरी तालुका छायाचित्रकार संघटना ब्रम्हपुरीचे सर्वच फोटोग्राफर उपस्थित होते.



