ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ विभागीय स्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडांगणावर जिल्ह्याअंतर्गत क्रीडा स्पर्धा सुरू आहे. त्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी या खेळामध्ये स्व.मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथील वय वर्षे १९ वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर विजय मिळवून यश संपादन केले. आणि विभागीय स्तरावर निवड झाली.

       विजयी संघाचे नेतृत्व श्रावणी काकडे हिने केले. साक्षी गजबे, समीक्षा चौधरी, आकांक्षा शेंडे, तनुश्री वैद्य, दिपाली पोहनकर, पुनम सोनुने,पौर्णिमा जांभुळे, प्रणाली चौधरी, रोहिणी राणे, श्रद्धा मुंढरे सोनिया धारणे इत्यादी विद्यार्थिनींनी विजय संपादन केला.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ.विवेक शिंदे, सदस्य डॉ.जयंत वानखेडे, प्राचार्य एम. एस.ताजने,प्रा.माधव केंद्रे, मनीष वाकडे, क्रीडा प्रशिक्षक मनोज बांदुरकर, संजय घोडे आणि क्रीडा प्रशिक्षिका सुरेखा कोडापे तसेच शाळा महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी विजयी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून विभागीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये