महाराष्ट्र नाभिक महामंडळाची सावली तालुका कार्यकारिणी निवड
तालुका अध्यक्षपदी संदीपजी सायत्रावार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली.
व्याहाड खुर्द येथील सामाजिक सभागृहात तालुक्यातील नाभिक समाज बांधवांनी आयोजित केलेल्या सभेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रविंद्र येसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रमेश नक्षीण,यांच्या प्रमुख उपस्थितीत सावली तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली,यामध्ये तालुकाध्यक्ष पदी संदीप सायत्रावार,यांची एक मताने निवड करण्यात आली.तर तालुका कार्याध्यक्ष अरुण सुर्यवंशी,सचिव गणेश झांम्पलवार, कोषाध्यक्ष विनोद भंडारे,उपाध्यक्ष बालाजी उद्रपवार, संघटक म्हणून मोहन सुर्यवंशी,मयुर सुत्रपवार* यांची निवड करण्यात आली.
*सावली तालुक्याला मिळाला जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा संघटक*
अनेक वर्षापासुन सावली तालुक्यात नाभिक समाजाची कोणत्याच प्रकारची संघटना नव्हती, जिल्हयाच्या टोकावरील मागासलेल्या सावली तालुक्यातील हा समाज अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत जिवन जगत असुन समाज बांधवांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघटीत रित्या उभे राहुन नाभिक समाजाला सामाजिक शैक्षणिक, राजकीय,मुख्य प्रवाहात येण्यासाठी तालुक्यातील समाजाची संघटना काळाची गरज होती, ही गरज लक्षात घेता, संघटन रुपी मोट बांधली जावी यासाठी तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते, दिलीप फुलबांधे,व संदीप सायत्रावार यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाची सावली तालुका शाखा स्थापन करण्याचे ठरविले.
तालुक्यातील समाज बांधवांना एकत्रीत करुन ३१ जानेवारी २०२६ रोजी तालुका कार्यकारिणी घोषीत करण्यात आली,तसेच जिल्हास्तरावर सावली तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी सभे दरम्यान जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून श्री दिलीप फुलबांधे यांची निवड करण्यात आली,तर जिल्हा संघटक, म्हणून श्री विनोद सुत्रपवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारीणी चे अभिनंदन करण्यात आले.यावेळी तालुक्यातील नाभिक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.तालुक्यातील नाभिक समाजाच्या समस्या शासन व प्रशासन दरबारी लावून धरण्यासाठी नवनिनियुक्त कार्यकारिणी कडुन विशेष प्रयत्न करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देण्यात आली.



