ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयामध्ये बी.के विधात्री दिदीचे अध्यात्मिक प्रवचन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय देऊळगावराजा येथे “जीवन परिवर्तनासाठी सुहावना सफर” या विषयावर दिल्ली येथील रिट्रेट सेंटर वरील बी.के. विधात्री दीदी यांच्या आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन दिनांक 18.नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात करण्यात आले होते. ह्यावेळी मंचावर ब्रम्हाकुमारी विद्यालयाच्या संचालिका आदरणीय बी.के. सुनंदा दीदी,बी.के विधात्री दिदी,बी.के. स्वाती दीदी, डॉ. अशोक काबरा, डॉ.शेटे मॅडम, डॉ.अनुजा डोणगावकर मॅडम,सौ. राखी काबरा,माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे यांची विशेष उपस्थिती होती. मानवाच्या जीवनामध्ये अनेक समस्या येत असतात. त्या समस्येचे निराकरण कसे करावे यावर अनेक प्रकारची उदाहरणे देऊन तसेच विस्तृत माहिती देऊन उपस्थिताना बी.के. विधात्री दिदी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सौ.लता राजपूत यांनी केले.

* दुपारच्या सत्रामध्ये श्री शिवाजी विद्यालय येथे शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणीचे तसेच निवड श्रेणीचे प्रशिक्षणामधे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय सपकाळ साहेब यांची परवानगी घेऊन शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये थकान आणि तणाव मुक्त जीवन कसे जगावे या विषयावर विधात्री दिदीनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.त्यासोबतच शिक्षकांशी मोकळेपणाने प्रश्न-उत्तराच्या स्वरूपामध्ये चर्चा केली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. तिवारी मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी. के.देवकला दिदी,श्री प्रल्हाद ढोरे, शेळके भाई, राजपूत भाई यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये