रोख रक्कम चोरीची तक्रार : नाकेबंदी करीत संशयित वाहनाचा पाठलाग करीत अडविले
पुढील कार्यवाही करीता वाहन आणि चालक ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 22/01/2026 रोजी तक्रारदार नामे प्रभाकर येरणे यांनी पोस्टे वरोरा येथे त्यांची स्वीफ्ट डिझायर कार क्र MH4629416 व कारमध्ये असलेली 60000/- रोख रक्कम हि मौजा खांबाडा तालुका वरोरा जि. चंद्रपुर येथून चोरी गेल्याची तक्रार दिल्यावरुन पोस्टे वरोरा जि. चंद्रपुर येथे अप क्र 58/2026 कलम 316 (2) BNS अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहीती म.पो. केंद्र जाम येथे प्राप्त असुन आज दिनांक 02/02/2026 रोजी राष्ट्रीय महामार्ग 44 येथे म.पो. केंद्र जाम येथील पेट्रोलीग करीत असलेले अधिकारी व अंमलदार यांना वरील गुन्हयाशी संशयीत नंबर नसलेली कार महामार्गाने हैद्राबादकडे जातांना दिसल्याने सदर कारचा पाठलाग करुन चालकास वाहन धावण्यास इशारा केला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता पळ काढला. परंतु कर्तव्यावर असलेले प्रभारी अधिकारी म.पो. केंद्र जाम जि. वर्धा दिलीप थाटे, पो.उप.नि. पो.उप.नि. प्रमोद धोटे, पो. हवा विकास काकडे ब.क्र. 786, पो.हवा. रंजीत फाले ब.क्र.570, पो.हवा. चंद्रकांत जिवतोडे ब.क्र. 1418, पो.हवा. सतिप नैताम ब.क्र. 1398, पो.शि.भूषन टॉग ब.क्र. 1079, म.पो.शि. आरती मसादे व.क्र. 1744 यांनी अत्यंत कसोशिने सदर वाहनाचा पाठलाग करुन मौजा आजंती शिवार येथे नाकाबंदी करुन सदर संशईत वाहनास व चालकास ताब्यात घ्येण्यात आले.
सदर वाहनाची तसेच वाहन चालकाची तपासनी केली असता सदर चालकाने आपले नाव प्रमोद अजाबराव मडावी वय 40 रा. पाटनबोरी ता. केळापुर जि. यवतमाळ असे सांगीतले. तसचे वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये कार ची MH46Z9416 क्र असलेल्या 2 नंबरप्लेट आढळून आल्या वरुन सदर कार वरील अपराधात चोरी गेली असल्याची स्पष्ट झाल्याने सदर वाहन चालक व कार ताब्यात घेवून म.पो. केंद्र जाम येथे आनण्यात आले.
सदर कार्यवाही बाबत पोस्टे वरोरा जि. चंद्रपुर येथील तपासी अधीकारी स.पो.नी झांबरे यांना फोनव्दारे माहीती देण्यात आल्यावरुन तपासी अधीकारी स.पो.नी झांबरे हे पोस्टॉफ सह म.पो. केंद्र येथे हजर आल्याने आरोपी व स्वीफ्ट डिझायर कार क्र MH46Z9416 हे पुढील कार्यवाही करीता ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही प्रभारी अधिकारी म.पो. केंद्र जाम जि. वर्धा दिलीप थाटे, पो.उप.नि. पो.उप.नि. प्रमोद धोटे, पो.हवा विकास काकडे ब.क्र. 786, पो.हवा. रंजीत फाले ब.क्र.570, पो.हवा. चंद्रकांत जिवतोडे ब.क्र.1418, पो.हवा. सतिष नैताम ब.क्र. 1398, पो.शि.भूषन टॉग ब.क्र. 1079, म.पो.शि. आरती मसादे ब.क्र. 1744 यांनी पार पाडली.



