ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ. ई. एस. गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयात रविवारी माजी विद्यार्थिनी स्नेहमिलन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित एफ. ई. एस. गर्ल्स हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज आणि एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भव्य माजी विद्यार्थिनी स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्नेहमिलन सोहळा शाळेच्या प्रांगणात पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव मोगरे, सचिव ॲड. पुरुषोत्तम सातपुते, मुख्याध्यापिका छाया मायकलवार, प्राचार्या डॉ. मेघमाला मेश्राम आणि संस्थेचे सदस्य संजय बेले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थिनी नियोजन समितीने केले आहे. वर्षानुवर्षे विखुरलेल्या माजी विद्यार्थिनींना पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. सर्व माजी विद्यार्थिनींनी या मेळाव्याचा लाभ घेत वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये