ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रासेयो स्वयंसेवकांनी राबविले ‘नशा मुक्त अभियान’

'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' पथनाट्याचा 25 वा प्रयोग 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी – भारत सरकारच्या युवा मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना संचालनालयाकडून राज्यातील निवडक 20 महाविद्यालयांना नशा मुक्त भारत अभियान’ राबवण्याकरिता निवडण्यात आले असून त्यात वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या एस एस एन जे कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी कॅप्टन प्रा मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर ठिकठिकाणी तरुण-तरुणींना व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन, जनजागृतीपर पथनाट्याचे तसेच इतर उपक्रमांचे आयोजन केल्या जात आहे.

या अभियानाचा एक टप्पा म्हणून 20 नोव्हेंबर रोजी स्थानिक यशवंत माध्यमिक कन्या विद्यालयाच्या प्रांगणात नशा मुक्त भारत अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका वसुंधरा बिरे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक सुधीर राठोड व सहकार्यक्रम अधिकारी प्रा जगदीश यावले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रासेयो स्वयंसेवक सार्जंट साक्षी पारिसे हिने एक तरुणी म्हणून व्यसनापासून आपण का दूर राहावे व त्यावरील उपाययोजना आपल्या भाषणातून सांगितले. यानंतर नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ हे पथनाट्य सादर करून वातावरण मंत्रमुग्ध करण्यात आले. उपस्थित 450 तरुणींना नशा मुक्त भारत अभियानाचे परिपत्रक व शपथेचे पत्रक वितरित करण्यात आले.

या प्रसंगी रासेयो स्वयंसेविका आरती मरघडे हिने उपस्थित तरुणांना ‘नशेपासून दूर राहू व इतरांनाही दूर ठेवण्याकरिता जनजागृती करू’ हि शपथ दिली. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या तरुणींचे संघ तयार करून चर्चासत्र आयोजित करण्यात आले व त्यातून ‘नशा मुक्त समाज करण्याकरिता तरुण काय करू शकतात’ या विषयावर सविस्तर चर्चा करून विषय समजावून घेण्यात आला.

पथनाट्यात रा से यो स्वयंसेवक प्रवेश किटे, सोमेश्वर पोराटे, तेजस वाघाडे, पवन पुरी, समीक्षा कन्नाके, वैष्णवी भोयर, चांद पोहाणे, राज पाटील, राम देशमुख, मयुरी वानखेडे, अंजली गढवेकर व दीक्षा डेहनकर, आकांक्षा थुल या कलाकारांचा समावेश होता. नशा मुक्त पथनाट्यातील कलाकार राम देशमुख याचा ‘व्यसनाचा राक्षस’ ही भूमिका व व्यसनाधीन झालेल्या तरुणाच्या आईची भूमिका साकारणारी दीक्षा डेहनकर यांच्या अभिनयाचे उपस्थित असणाऱ्यांनी कौतुक केले.

यशस्वीते करिता अंडर ऑफिसर स्नेहा मडकाम सार्जंट दुर्गेश पोटे सार्जंट सलोनी अजमिरे सार्जंट कुंदन कावडे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये