काँग्रेसचे वोट रक्षक हेच लोकशाहीचे तटरक्षक – जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे
राजुरा विधानसभा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न; वोट रक्षक अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिंपरी :_ लोकशाही व्यवस्थेचे बळ संविधानात असून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी करून कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सजग प्रहरी म्हणून काम करावे. काँग्रेसचे वोट रक्षक हेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे तटरक्षक आहेत, ज्या प्रमाणे देशाचे रक्षण हे तटरक्षक दल करते त्या प्रमाणे आपल्या वोट रक्षकांना भारतीय लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी भुमिका पार पाडावयाची आहे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार वोट रक्षक अभियान आणि संविधान रक्षा मार्चच्या नियोजनासाठी राजुरा विधानसभा काँग्रेसच्या बिएलए -१, ब्लाक अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, सर्कल अध्यक्ष यांची आढावा बैठक सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी अभियानाची उद्दिष्टे, संघटनात्मक जबाबदाऱ्या, बूथनिहाय नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी वोट रक्षक अभियानाचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी, प्रत्येक मतदान केंद्रासाठी वोट रक्षकांची नियुक्ती, त्यांना प्रशिक्षण, मतदार यादीतून वगळलेल्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी, नागरिकांचे निवेदन संकलन आणि दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. तसेच या कामावर ब्लाक अध्यक्ष व मंडळ अध्यक्ष दररोज देखरेख ठेवतील असे सांगितले.
प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक प्रशिक्षित वोट रक्षक नियुक्त करन २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संविधान रक्षा मार्चमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे आणि अभियानाच्या माध्यमातून संविधान, लोकशाही व मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, डॉ. अंकुश गोतावळे, अशोक रेचनकर, सोनू दिवसे, सभापती तिरुपती इंदूरवार, माजी तालुकाध्यक्ष गणपत आडे, देविदास सातपुते, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, राजू झाडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, शंभूजी येलेकर, देवेंद्र बट्टे, तुकेश वानोळे, कमलेश निमगडे, माधव लडके, तुषार बावणे, वनिता वाघाडे, रेखाताई रामटेके, नामदेव सांगळे, देवानंद चांदुरकर, धनराज चिंचोलकर, सुधीर थिपे, अभय मुनोत, मिलिंद ताकसांडे, एकनाथ गोखरे, विनोद झाडे, अभिजीत धोटे, लक्ष्मीकांत कोटनाके, रंजित पिंपळकर, रविंद्र करमनकर, बबन ताकसांडे, चंदु बुजाळे, श्रीनिवास कंदनूरीवर, साईनाथ कोडापे, सारनाथ बक्षी, राजेश डोंगरे, रफीक शेख, संजय झाडे, अभय शेंडे, सारंग गिरसावळे, भूषण बानकर, सय्यद साबिर, इर्शाद शेख, प्रणय लांडे, कल्पतरू कन्नाके, गौतम जुमळे यांच्यासह राजुरा विधानसभा काँग्रेसचे पदाधिकार उपस्थित होते.



