ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

चांदा ब्लास्ट

भारत सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनात माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष पाहता यावे, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने गांधी चौक, चंद्रपूर येथे सार्वजनिक थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या, शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

सदर कार्यक्रमासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिका पार्किंग मैदान हे स्थळ वापरण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले असून स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आयोजकांच्या वतीने आवश्यक ती दक्षता घेण्यात आली होती.

हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्राचे लोकनेते तथा माजी मंत्री मा. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. हरीश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक श्री. राहुल पावडे, सौ. सुनीता जयस्वाल, श्री. रवी लोणकर, राम लखीया श्री. प्रकाश धारणे, बल्लारपूर शहर भाजप अध्यक्ष एडवोकेट रणजयसिंग मंडळ अध्यक्ष श्री. श्रीनिवास जंगमवार, श्री. बी. बी. सिंग चंद्रकला सोयाम मनीषा महातव यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चंद्रपूर शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या थेट प्रक्षेपणामुळे सामान्य नागरिकांना देशाच्या आर्थिक धोरणांची, विकासाच्या दिशेची आणि केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रत्यक्षपणे मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये