ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात भन्ते विनाचार्य यांचा भद्रावती जनसंवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात दीक्षाभूमी ते चैत्य भूमी पंचशील धम्म ध्वज यात्रे अंतर्गत भन्ते विनाचार्य यांचा जनसंवाद कार्यक्रम दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोज गुरवारला दुपारी 1 ते 4 या वेळेत पंचशील बुद्ध विहार भवन, भद्रावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या जनसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नितीन गजभिये निमंत्रक बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र राज्य हे असून स्वागताध्यक्ष मा. मोरेश्वर चंदनखेडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर हे आहेत. बुद्धिस्ट समन्वय समितीचे निमंत्रक मा. स्मिता वाकडे, मा. गोपाल रायपूरे, मा. मारोतराव रायपूरे उपस्थिती राहतील.

     महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात दि. 17 आगस्ट ते 24 सप्टेंबर 25 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वात पंचशील धम्म ध्वज यात्रा सुरु आहे. दिनांक 18 सप्टेंबर 25 रोजी या यात्रेचे आगमन चंद्रपूर ज़िल्ह्यात होत आहे. या यात्रेचे ठीक ठिकाणी स्वागत आणि जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

वरोरा येथे रत्नामाला चौक येथील स्वागता नंतर ही यात्रा भद्रावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे पोहचेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन मिरवणुकीने पंचशील बुद्ध विहार भवन, पंचशील नगर येथे पोहचेल. तिथे स्वागत समारंभ आणि जनसंवाद कार्यक्रम होईल. त्यानंतर चंद्रपूर कडे यात्रेचे प्रस्थान होईल. चंद्रपूर येथे प्रियंदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात जनसंवाद कार्यक्रम होईल.

तरी या पंचशील धम्म ध्वज यात्रा आणि जनसंवाद कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित राहून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलस समर्थन द्यावे अशी विनंती बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र राज्य चे निमंत्रक सिद्धार्थ सुमन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये