ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त वक्तृत्व आणि एकपात्री भुमिकाभिनय स्पर्धा संपन्न”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंतांच्या तत्वज्ञानावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आणि एकपात्री भुमिकाभिनय स्पर्धा कार्यक्रम तसेच ग्रामगीताचार्य यांचा सत्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यासपीठ गांधी चौक वरोरा येथे घेण्यात आला.

     कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य महेश डोंगरे यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्मिता धोपटे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून मा. लक्ष्मणराव गमे माजी सेवा अधिकारी गुरुकुंज मोझरी,प्रा कावळे,से.नि.प्राचार्य मदनराव ठेंगणे, प्राचार्य राहुल राखे, मानवाधिकार आयोगाचे प्रांताध्यक्ष डॉ अंकुश आगलावे, मुख्याध्यापिका मंगला ठेंगणे, प्राचार्य गुरुदेव जूमडे तर परिक्षक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य शरद जोगी, सेवानिवृत्त शिक्षक ढोके सर, सेवानिवृत्त शिक्षक गेडाम सर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी सुरवातीला ग्रामगीताचार्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामगीताचार्य मनोहर पारोधे,सौ मंगला डांगरे,सौ नीता बोढे,सौ सुनिता कारेकर यांचा सत्कार माजी सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

  वक्तृत्व स्पर्धा आणि एकपात्री भुमिकाभिनय स्पर्धेत परिसरातील विद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यात एकपात्री भुमिकाभिनय स्पर्धेत विवेकानंद विद्यालय वरोरा येथील पारस दसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कु संस्कृती जुनघरे अरविंद विद्यानिकेतन वरोरा आणि त्रृतीय क्रमांक साक्षी पिसे नुतन नेहरू विद्यालय नागरी हिने प्राप्त केला.

 वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पुरस्कार हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथील कु श्रेयशी चिकनकर हिने प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक मानसी देऊळकर आणि त्रृतीय क्रमांक आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथील विद्यार्थीनीने प्राप्त केला.

    स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ अंकुश आगलावे यांच्यातर्फे रोख रक्कम,शिल्ड व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 कार्यक्रमात उपस्थितांना लक्ष्मणराव गमे,प्रा कावळे, प्राचार्य डोंगरे, डॉ अंकुश आगलावे, मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, परिक्षक सेवानिवृत्त प्राचार्य शरद जोगी, मनोहर पारोधे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा कावळे यांनी केले तर संचालन गुरुदेव सेवा मंडळाचे नंदकिशोर खिरटकर यांनी केले पाहुण्यांचे आभार ग्रामगीताचार्य रमेश तावाडे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये