रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानात समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पं. दे.कृ. वि.अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय दे.राजा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेकांनी प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलिसांनी आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानात सहभाग नोंदवला. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस व वाहतूक कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीत सहभागी झाले.
या रॅली मधून १८ वर्षाखालील मुलामुलींनी वाहन चालवू नये तसेच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाहन चालवताना परवाना काढणे बंधनकारक असून, दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा हेल्मेट वापरल्याने अपघाताच्या वेळी डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी होतो आणि जीव वाचू शकतो हे उदाहरणासह समजून सांगितले. वाहन चालवताना आरसी बुक, लायसन्स व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांना व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या अभियानात पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी, समाधान बंगाळे, वाहतूक पोलीस दिघोळे, जायभाये तसेच महाविद्यालयाचे प्रा. योगेश चगदळे, राष्ट्रीय सेवा योजना,प्रा.अरुण शेळके जिमखाना इन्चार्ज, प्रा.विकास म्हस्के उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वाहतूक नियमावर जागृती निर्माण करण्याचा त्यांचा कौतुकास्पद करत आहे.
महाविद्यालयाचे प्रा. योगेश चगदळे, राष्ट्रीय सेवा योजना,प्रा.अरुण शेळके जिमखाना इन्चार्ज, प्रा.विकास म्हस्के उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वाहतूक नियमावर जागृती निर्माण करण्याचा त्यांचा कौतुकास्पद करत आहे.



