स्व. अर्जुनराव गोतावळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील मौजा कुंभेझरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अर्जुनराव निवृत्ती गोतावळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टेकामांडवा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गोतावळे कुटुंबीयांकडून गेल्या दहा वर्षांपासून पुण्यस्मरणानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही ५ ऑगस्ट २०२६ रोजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमावेळी ज्येष्ठ नागनाथ महाराज तोगरे, दत्ता तोगरे, प्रा. सुग्रीव गोतावळे, डॉ. अंकुश गोतावळे, दीपक गोतावळे, लहुजी गोतावळे,अनिता गोतावळे, सौ. जयश्री गोतावळे, सौ. मंदा गोतावळे, धनलक्ष्मी गोतावळे, भगवान कांबळे, रामू गोतावळे, पिंटू तत्तापुरे, संतोष गोतावळे, बाबू राठोड, बापूराव राठोड, मुकिंद राठोड, धोंडू तात्या गोतावळे, प्रभू बसवंते, रवी जेवाले, सिताराम भुरे, दत्ता गायकवाड, सुनील आरेवार, अंकुश कांबळे, नामदेव भालेराव यांच्यासह असंख्य महिला-पुरुष आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोतावळे कुटुंबीयांच्या या समाजहिताच्या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, पुण्यस्मरण दिन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरू शकतो, असा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.



