ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहा चोरीच्या मोटारसायकलींसह २ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती डी.बी. पथकाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या सहाय्याने भद्रावती डी.बी. पथकाने एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली. सखोल चौकशीदरम्यान संबंधित बालकाने आणखी एका विधिसंघर्ष बालकाच्या साथीने भद्रावती व परिसरातील विविध ठिकाणांहून दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत एकूण सहा चोरीच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकली जप्त केल्या. त्यामध्ये एमएच-३४-सी-९०२४ (किंमत ₹३० हजार), एमएच-३४-सीसी-४५७० (₹८० हजार), एमएच-३४-एन-२७७३ (२० हजार), एमएच-३४-बीएल-५१३०7 ( ३० हजार), एमएच-३४-व्ही-८१२८ ( ३० हजार) आणि एमएच-३४-एस-८५३९ (३० हजार) क्रमांकाच्या मोटारसायकलींचा समावेश असून, एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त वाहनांचा पंचनामा करून संबंधित विधिसंघर्ष बालकाविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा क्रमांक ७२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (चंद्रपूर) संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सपोनि. विरेंद्र केदारे, पोउपनि. संतोष केदार, गजानन तुपकर, सफौ. महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे व संतोष राठोड यांनी सहभाग घेऊन यशस्वीरीत्या कारवाई केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये