ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस ठाणे वर्धा शहर येथे फिर्यादी यांचे घरून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त

फिर्यादीस 15 ग्राम सोने व 80 ग्राम चांदी परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे श्रीमती पुष्पा हरीभाऊ खोडके, रा. शाहु लेआऊट नालवाडी वर्धा हया घरी लॉक लावुन बाहेरगावी गेल्या असता कोणतरी अज्ञात चोराने त्यांचे घराचे लॉक तोडुन त्यांचे घरून 15 ग्राम सोने व 80 ग्राम चांदी चोरून नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस ठाणे वर्धा शहर येथे अपराध कमांक 436/2013 कलम 457, 380 भा.दं.वि. चा गुन्हा दिनांक 09/10/2013 रोजी दाखल करून तपासात घेतलेला होता.

सदर गुन्हयांत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन त्याचेकडुन गुन्हयांत चोरी गेलेला मुद्दे‌माल 15 ग्राम सोने व 80 ग्राम चांदी जप्त करण्यात आलेला होता. सदर जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे जमा होता. सदर मुद्देमाल 15 ग्राम सोने व 80 ग्राम चांदी फिर्यादी श्रीमती पुष्पा हरीभाऊ खोडके, रा. शाहु लेआऊट नालवाडी वर्धा यांना पोलीस ठाणे वर्धा शहर येथील ठाणेदार श्री नागेशकुमार चतरकर, व महीला पोलीस अंमलदार श्रीमती जयश्री नाईक यांचे हस्ते परत देण्यात आलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये