ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटनेच्या वतीने मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर

चंद्रपूर :-अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटना महाराष्ट्र राण्य विदर्भ प्रांतीय अध्यक्ष शंकर पगडपलीवार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मा.आमदार तथा माजी अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याच्या वाढदिवसाचे औचित्त साधून मादगी समाजाच्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सदर निवेदन देण्यात आले .निवेदनात अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत राबविन्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना जाचक अटी शर्थी मुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

सुलभ योजनेचा लाभ मिळत नाही निवेदनात 1)कर्ज योजनेतील जामीनदारा संदर्भातील जाचक अटी शितील करणे 2) लाभार्थ्याला घराचा ,उपलब्ध मालमत्तेचा किंवा शेतीचा कागदपत्राचा व्यवाहार्थ पद्धदतीने जामीन म्हणून स्वीकार करावा 3)मंजूर प्रकरणे तातडीने कर्ज वितरीत करून बेरोजगार युवक व महिला यांना व्यवसाय व उदयोग सुरु संधी द्यावी.4) अनुसूचत जातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या व्यवहारीक अडचणीचा विचार करून त्यातील धोरणात्मक बदल करण्याचे संबंधित विभागाला निर्देश द्यावे 5)मादगी समाजासाठी पूर्वी शासणाने उपलब्ध करून दिलेल्या जागा बाबत प्रलंभीत प्रकरणा चा सकारात्मक विचार करून योग्य कार्यवाही करावी 6) अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणा संदर्भातील शासन निर्णयामध्ये चंद्रपूर ,गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील मादगी समाजाचे प्रतिनिधित्व व हक्क आबाधित राहील याची दक्षता येण्यात यावी आवश्यक असल्यास शासन स्तरावर योग्य तो अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावा.इत्यादी बाबी सदर निवेदनात नमूद करण्यात आल्या. सदर निवेदनाचे तात्पर्य लक्षात घेऊन मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार आमदार तथा माजी अर्थ मंत्री यांनी मा.ना.श्री.संजय शिरसाट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री याबाबत पत्र व्यवहार केला तसेंच निवेदनातील नमूत मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्या ने अखिल भारतीय मा दगी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व समाज बांधव श्री मा. जयदेव जी त्रिशुलवार प्रदेश उपाध्यक्ष. मा. सुनील जी त्रिशुले कल्याणकारी मादगी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष श्री मा. शंकर भाऊ पेगट परिवार विदर्भ अध्यक्ष मा. रमेश भाऊ लिंगमपल्लीवार सामाजिक कार्यकर्ता श्री मा. अनिल जी बद्दलवार जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर मा. बबलू जी अक्केवार युवा प्रदेशाध्यक्ष श्री मा. शंकरजी दासरी कार्याध्यक्ष चंद्रपूर मा. बुधेश्वर गोरडवार जिल्हा सचिव चंद्रपूर श्री मा. विकास भाऊ चिलमे सचिव शाखा अयरी मा. शंकर भाऊ आईलवार शाखा अध्यक्ष अहिरे मा अंबादास मोहुरले तालुका सहसचिव कोरपणा  मा. नंदकिशोर बेगड पल्ली वार युवा सामाजिक कार्यकर्ता मा. अतुल भाऊ पेगडपलीवार सर्व पदाधिकारी व मा द गी समाज बांधव उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये