आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हॉटेल मधून युवकाचे चार लाख उडविले

अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    जवळ असलेले चार लाखाची रक्कम घेऊन हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलेल्या युवकाचे टेबलावरून चार लाख उडवल्याची घटना दिनांक १५ रोज सोमवारला दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात घडली.

आशिष यशवंत काळे वय ३१ वर्ष राहणार ब रांज मोकासा असे रक्कम चोरी गेलेल्या युवकाचे नाव आहे आशिष याला बरांज खुल्या कोळसा खाणीच्या प्रकल्पातून काही रक्कम मिळाली होती त्या रकमेतून तो शेती खरेदी करण्यासाठी चार लाखाची रक्कम एचडीएफसी बँकेतून काढली व उर्वरित रक्कम पाच लाख काढण्यासाठी तो स्टेट बँक ऑफ इंडिया येथे आला होता.

बँकेत विड्राल भरला रक्कम मिळण्यासअवधी असल्याने त्याने त्याच बँकेच्या खाली असलेल्या संतकृपा हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला व टेबलावर जवळ असलेली रक्कम ठेवून हात धुण्यासाठी गेला असता त्याच वेळात अज्ञात चोरट्यांनी त्याच्या टेबलावरची रोख रक्कम चार लाख लंपास केले यानंतर फिर्यादीने टेबलावर पिशवी बघितली असता त्याला ती दिसली नसल्याने त्याला चोरी झाल्याचे कळले.

भद्रावती पोलीस स्टेशन गाठून या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली ठाणेदार योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात गुन्हे अन्वेशन विभागाची टीम या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये