वाहतूकचे नियम मोडणाऱ्या अल्पवयीन वाहनचालकांवर वर्धा वाहतूक शाखेचे कडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 16/9/2025 रोजी वर्धा वाहतूक शाखेतर्फे बजाज चौकात वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांवर कारवाई सुरू असताना यावेळी अल्पवयीन दोन मुले हिरो होंडा कंपनीची जुनी गाडी चालवताना दिसून येताच वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धिरज पांडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय डोळे आणि पोलिस शिपाई किशोर माहुरकर यांनी गाडी थांबवून त्या अल्पवयीन वाहनचालक मुलांना विचारले असताना तुझ्या कडे विनापास परवाना आहे काय तर त्यांच्या कडे काही कागदपत्रे मिळून आले नाही.
याकरिता वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस निरीक्षक संदिप कापडे व पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धिरज पांडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय डोळे व पोलिस शिपाई किशोर माहुरकर यांनी दुचाकी गाडी अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.