मायबाप त्रिमूर्ती सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढा _ वसंत मुंडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनसुद्धा शासनाने केंद्र व राज्याच्या एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या नियमाच्या अंतर्गत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान जनावरे मरण पावली शेतकऱ्यांचे घरे व गोठ्याचे नुकसान झाले अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले असून त्रिमूर्ती सरकारने वेगवेगळे निकषांतर्गत पंचनामे करून हेक्टरी ५०हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत करण्यासंदर्भात आदेश काढून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली.
अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात धरणाचे नदी नाल्याचे पुराचे पाणी घुसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर सर्व स्तरात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पिके जनावरे शेतातील गोठे वेगवेगळे फळबाग इलेक्ट्रिक मोटर शेती अवजारे वाहून गेलेले आहेत. सर्व स्तरात शेतकरी आर्थिक दृष्ट्या हातबल झालेला असून शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी करूनही शेतकऱ्याला पिक विमा अतिवृष्टीचे व वेगवेगळे शासकीय अनुदानाचे पैसे आजतागायत मिळालेले नाहीत. अगोदरच शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली आहे निसर्गाची साथ नसल्यामुळे बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधी मुळे शेतकरी चारी बाजूंनी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेला आहे.
तरी शासन शेतकऱ्याला हमीभावाप्रमाणे बाजारपेठेत शेतीमाल शेतकऱ्याचा खरेदी विक्री होत नाही त्यावर शासन कडक धोरण अवलंबित नाही. त्यामुळे शेतकरी हा संपूर्णपणे कौटुंबिक अडचणीमुळे मुलांच्या शिक्षण दैनंदिन व्यवहार आणि जीएसटी कर हा विविध ठिकाणी शेतीच्या अवजारे व मालावर बी बियाणे कीटकनाशके औषधावर लावल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.
तरी विनाअट एनडीआरएफ एचडीआरएफ च्या निकषांतर्गत हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली.